Sunday, December 27, 2009

आमचे शेंगाले गुरूजी..

इयत्ता १ ली .....
दुपारचे १२.०५ वाजलेले आहेत...

प्राथना नुकतीच संपलेली असते....
गुरूजी वर्गात येतात ...एव्हाना वर्गातील गोंधळ सह्याद्रीची उंची गाठलेला असतो...
गुरूजी वर्गात आलेले आहेत अणि कोणाचेही त्यांच्याकडे लक्ष नाही...
तेवढ्यात कोणाच्या तरी पाठीत धपाटा घातल्याचे ऐकू येते...आणि त्याच बरोबर गुरुजींची नेहमीची शिवी.......
'हलकट .....वर्ग आहे की..मंगलवारचा बाजार ॥!'
सगळा वर्ग शांत होतो। आतापर्यंत तय दगडी भिंतीच्या वर्गात चिमण्यांची ,पारव्यांची आणि मुलांची चाललेली मस्ती संपलेली असते.....

गुरूजी टेबल वरची धुल झाडतात ...आणि पहिल्या रांगेत बसलेल्या कुलकर्णी च्या (छोट्या) पोराला फला पुसायला सांगतात।

तो आजची तारीख लिहितो आणि सुविचार मोठ्याने वाचून दाखवतो .'नेहमी खरे बोलावे '

गुरूजी हजेरी घेतात ....
क्र.१ गाईचे कवाड (गायकवाड)
क्र.२ आलान कर (अलान्द्कर)
क्र.३ फाशी घे (फाजगे)
....इ.इ ...
गुरूजी: काय रे माधव (तिराल्या) काल का नाही आला शाळेत?
माधव:गुरूजी,काल आमची आजी वारली।
गुरूजी : आ .मागच्या वेळी सुद्दा तुझी आजी गेली होती ना रे ।
माधव : नाही गुरूजी...तवा वडिलांची आई ....यावेळी आईचीआई होती....
गुरूजी: शाब्बास ....असा च आपल्या खानादानाची वाट लाव हा...हलकट।
मघाशी मी कोणाला मारलेले होते रे ...हा निलेश सांग .....काल आपण काय शिकत होतो....??
थोड्या वेलानंतर निलेशने बाहेर अंगठे धरलेले असायचे।

आमचे शेंगाले गुरूजी आम्ही जेव्हा पहिली च्या वर्गात गेलो तेव्हा आम्हाला हे सर होते....आमची दगडाची शाळा गावात होती.....शेजारी गुरांचा दवाखाना .....मागे शेती ओढा आणि विलायती चिंचेची झाडे होती.........दुपारी १२ ते ५ शाला ..मुलींची सकाली............याच शाळेत आम्हाला गुरुजीनी घडवले (..बी)। आमचे गुरूजी कड़क होते,विनोदी होते...हुशार होते,,आणि थोड़े सरक्लेले होते.आमच्या सर्व पोरांचा जन्मापासून चा इतिहास या गुरुजिंचा पाठ होता.आमची बाहेर प्राथना व्हायची ..पण गुरूजी वर्गात पुन्हा ..'खरा तो एकची धर्मं 'घ्यायचे. 'हिरवे हिरवे गार गालिचे ...'ही त्यांची आवडती कविता होती।
गुरूजी तब्येतिने बरे ...थोडेसे स्थूल ,डोळ्याला चश्मा, अंगात पायजामा-शर्ट ,नाहीतर कधी कधी सफारी आणि पायात काली चप्पल ..एक हातात हजेरी बुक घेउनच वर्गात प्रवेश व्हायचा ..गुरुजीनी कधीही काठी वापरली नाही.आम्हाला त्यानी सिंहगड दाखवला,तुलापुर दाखवले.गावत सार्वजानिक स्वछता मोहिम सुध्हा राबवली.आम्ही त्यावेळी आख्खे गाव स्वच्छ केले होते.१५ अगस्त आणि २६ जानेवारी ला त्यांचा उत्साह पहायचा.त्यानी आम्हाला लेझीम खेलायाला शिकवले.त्यांच्या पेटी वदना बरोबर आम्ही स्वागत गीत म्हणायचो।
खेलायाच्या तासाला ते आम्हाला मन भरून खेलु द्यायचे.